विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 8, 2018, 09:26 AM IST
विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड title=

केपटाउन : तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली.

कोहलीने या सीरीजमध्ये दुसरं शतक ठोकलं. यासोबतच त्याने वन-डे करिअरमधलं 34 वं शतक पूर्ण केलं. कोहलीने त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत.

1. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर बायलेट्ररल सीरीजमध्ये कर्णधार म्हणून विराट सर्वात जास्त शतक लगावणारा खेळाडू बनला आहे.

2. एक खेळाडू म्हणून आफ्रिकेमध्ये विराट चौथा खेळाडू आहे ज्याने एका सीरीजमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकले आहेत. हा रेकॉर्ड आतापर्यंत केविन पीटरसनच्या नावावर होता. त्याने 2005 मध्ये आफ्रिकेमध्ये 3 वनडे शतक ठोकले होते. त्याच्या शिवाय जो रूटने 2016 मध्ये डेविड वॉर्नर 2016 मध्ये आणि 2018 मध्ये विराट कोहलीने एका पेक्षा अधिक शतक केले आहेत.

3. कर्णधार म्हणून सर्वात अधिक शतक ठोकणारा विराट कोहली पहिला खेळाडू बनला आहे. त्याने सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे. गांगुलीने 143 इनिंगमध्ये 11 शतक ठोकले. विराटने कर्णधार म्हणून 43 इनिंगमध्ये 12 शतक ठोकले आहेत.

4. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट पेक्षा अधिक शतक सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. या गोघांनी आफ्रिकेत 5-5 शतक ठोकले आहे.

5. कोहली दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी सौरव गांगुलीने 127 रनची खेळी केली होती.