क्रिकेटच्या मैदानाताच नव्हे तर बॉलिवूडच्या सिनेमातंही Andrew Symonds झाली होती एन्ट्री

आता सायमंड्सचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलं आहे.

Updated: May 15, 2022, 12:09 PM IST
क्रिकेटच्या मैदानाताच नव्हे तर बॉलिवूडच्या सिनेमातंही Andrew Symonds झाली होती एन्ट्री

मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. वॉर्ननंतर आणखी एक दिग्गज खेळाडू गमावल्याची भावना आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. सायमंड्सच्या निधनानंतर अनेकजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. अशातच आता सायमंड्सचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलं आहे.

फार क्वचित लोकांना माहिती असेल की, अँड्र्यू सायमंड्सने बॉलिवूडच्या एका सिनेमात काम केलं आहे. क्रिकेटच्या पिचवर तुफान फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाई ऑलराउंडरअँड्र्यू साइमंड्सने पटियाला हाउस या बॉलिवूड सिनेमातंही काम केलं आहे. 

पटियाला हाऊस या सिनेमात सायमंड्सने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2011 च्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.

या चित्रपटात अँड्र्यू सायमंड्सने स्वतःचीच भूमिका साकारली होती. सायमंड्सचा हा पहिलाच चित्रपट होता, त्यानंतर त्याची हिंदी चित्रपटांमध्ये आवड वाढली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सायमंड्स चित्रपटातील सहकलाकार ऋषी कपूर, अनुष्का शर्मा आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत खूप धमाल केल्याचं समोर आलं होतं. 

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x