मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठमोठा खेळाडू अजिंक्य रहाणेवर सातत्याने टीका होताना दिसतायत. अजिंक्य केकेआरच्या टीममधून खेळत असून यंदाच्या सिझनमध्ये त्याची बॅट काही खास खेळ करू शकलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रत्येक सामन्यानंतर टीकांना सामोरं जावं लागतं. मात्र कालच्या सामन्यात घडलेल्या एका घटनेमुळे तुम्हीही अजिंक्य रहाणेचं कौतुक कराल.
कालचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात अखेर कोलकात्याच्या टीमने बाजी मारली. मात्र तरीही कोलकात्याचा ओपनर अजिंक्य रहाणेवर टीका करण्यात आल्या. कालच्या सामन्यातंही त्याला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र काल दुखापत होऊनही अजिंक्य रहाणे एखाद्या लढवय्याप्रमाणे मैदानावर उभा होता.
हैदराबादविरूद्ध सुरुवात करताना अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता. यावेळी त्याने अधूनमधून मोठे फटके खेळले. मात्र उमरान मलिकने 28 रन्समध्ये अजिंक्यला माघारी धाडलं.
मात्र मैदानावर फलंदाजी करत असताना अजिंक्य रहाणेला वेदनांचाही सामना करावा लागला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. यावेळी तो प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये शशांक सिंगने अफलातून कॅच घेत अजिंक्यला पव्हेलियनमध्ये पाठवलं.
Valiant effort by our Knight, @ajinkyarahane88 #AmiKKR #KKRvSRH #IPL2022 pic.twitter.com/Z5onogpOiD
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 14, 2022
मात्र या 28 रन्सच्या खेळीत अजिंक्यने 3 खणखणीत सिक्स खेचले. वेदना होत असूनही खेळत राहिल्याने चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे.