तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर आलीये. मोहाली वनडेत शतक ठोकणारा अँजेलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो तिसऱ्या आणि निर्णायक वनडे निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 16, 2017, 11:04 AM IST
तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर title=

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर आलीये. मोहाली वनडेत शतक ठोकणारा अँजेलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो तिसऱ्या आणि निर्णायक वनडे निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. 

दुसऱ्या वनडे सामन्यात मॅथ्यूजला स्नायूंवर तणाव आल्याने त्रास झाला होता. आज संघासोबत सराव करताना मॅथ्यूज दिसला. मॅथ्यूज फिट असून तो निर्णायक सामन्यासाठीच्या निवडीसाठी उपलब्ध असणार असल्याचे टीम मॅनेजर अशांका गुरुसिंघे यांनी सांगितले.

मॅनेजर म्हणाले, मॅथ्यूज फिट आहे. गेल्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये त्याला मांसपेशी खेचल्या गेल्याने त्रास झाला होता. मात्र त्या दुखापतीतून आता तो सावरलाय. आज त्याने नेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी सरावात सहभाग घेतला. संघातील १५ खेळाडू फिट आहे आणि निवडीसाठी तो उपलब्ध असणार आहे.