नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासात फिरोजशाह कोटला मैदाना अनेक कारनाम्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण १९९९ च्या ७ फेब्रुवारीला या मैदानात जे झालं ते भारताच्या क्रिकेट इतिहासात कधीही झालं नव्हतं.
वर्ल्ड क्रिकेटमध्येही अशी घटना पहिल्यांदा झाली होती. टीम इंडियाचा जंबो म्हणजेच अनिल कुंबळे याने एक अशक्य गोष्ट केली होती. त्याने पकिस्तान विरूद्धच्या दुस-या टेस्ट सामन्यात चौथ्या दिवशी दुस-या इनिंगमध्ये १० च्या १० विकेट घेतल्या होता. याआधी हा कारनामा इंग्लंडचा जिम लेकर यानेच केला होता.
या सामन्याशी निगडीत एक पैलू हा आहे की, जर कुंबळेने हा कारनामा केला नसता तर पाकिस्तान हा सामना जिंकण्याच्या मार्गावर होते. त्यांना विजयासाठी ४२० रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. दोन दिवसांचा खेळ बाकी होता. मैदानात आलेल्या पाकिस्तान टीमने एकही विकेट न गमावता १०१ रन्स केले होते. आता त्यांना ३१९ रन्स हवे होते. त्याचवेळी अनिल कुंबळेने शाहीद आफ्रिदीला एलबीडब्ल्यू केले.
त्यानंतर जंबोने एकापाठी एका पाकिस्तानच्या खेळाडूंची शिकार सुरू केली. पाहता पाहता त्याने पाकिस्तानच्या ९ विकेट घेतल्या. शेवटी वसीम अक्रम आणि वकार युनूस मैदानात होते. जनरली क्रिकेटमध्ये खेळाडू आपली विकेट कशी वाचवायची याची योजना आखतात. पण या सामन्यात आऊट होण्याची योजना पाकिस्तानी खेळाडू वकार यूनूस करत होता. याबाबतीत विरेंद्र सेहवागने खुलासा केला होता.
Kismat ke aage ,all saazish fail.
Well done Wasim bhai.
What a day it was at the Kotla by Anil bhai. pic.twitter.com/xDzMd39XOq— Virender Sehwag (@virendersehwag) February 7, 2017
सेहवागनुसार, कुंबळे जेव्हा या रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला तेव्हा क्रिजवर वकारला स्वत: रन आऊट व्हायचे होते. पण पाकिस्तानी टीम कर्णधार वसीम अकरममुळे वकारची ही योजना अपयशी ठरली. वसीम वकारला म्हणाला की, जर कुंबळेच्या नशीबात हा रेकॉर्ड असेल तर त्याला पण रोखू शकणार नाही. पण हे नक्की की, मी त्याला माझी विकेट देणार नाही. पण त्यानंतर थोड्याच वेळात त्याने वसीमला आऊट केले.
दुस-या खेळीत अकरम ३७ रन करून कुंबळेच्या बॉलवर वीवीएस लक्ष्मणला विकेट देऊन बसला. कुंबळेने या खेळीत ७४ रन्स देऊन १० विकेट घेतल्या. तेच याच टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कुंबळेने ४ विकेट घेतल्या होत्या.