Rohit sharma नंतर अजून खेळाडूला कोरोनाची लागण!

रोहित शर्मानंतर अजून एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jun 27, 2022, 08:12 AM IST
Rohit sharma नंतर अजून खेळाडूला कोरोनाची लागण! title=

मुंबई : इंग्लंड क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड क्रिकेट टीमसोबत मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. मात्र याचदरम्यान टीमचा विकेटकीपर आणि फलंदाज बेन फॉक्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. फॉक्स लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण तो कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सॅम बिलिंग्सचा त्याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लीड्सच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जातोय. फॉक्स लीड्समध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीचा भाग होता आणि चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी बेन फोक्स कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. यानंतर त्याला तात्काळ आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं.

सध्या टीम इंडियाही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी टेस्ट खेळली जाणार आहे. याआधी टीम इंडिया लीसेस्टरशायरसोबत सराव सामना खेळतेय. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर बीसीसीआयने त्याला आयसोलेशनमध्ये पाठवलंय.

जगभरात कोरोनाचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. पण ब्रिटनमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेल्या क्रिकेटमध्ये कोरोनाची प्रकरणं समोर येतायत. जर टीममध्ये कोरोनाची प्रकरणं अशीच समोर येत राहिली तर पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी मालिका कोरोनामुळे पुन्हा रखडू शकते.