INDvsAUS: अनुजा पाटिलच्या नेतृत्वात आज ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया आमनेसामने

भारतासोबत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम आज भारताच्या ए टीमसोबत सराव सामना खेळणार आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 6, 2018, 08:37 AM IST
INDvsAUS: अनुजा पाटिलच्या नेतृत्वात आज ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया आमनेसामने title=

मुंबई : भारतासोबत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम आज भारताच्या ए टीमसोबत सराव सामना खेळणार आहे. 

१२ मार्चपासून वनडे सीरिज

अनुभवी फलंदाज मॅग लॅनिंगच्या नेतृत्वात आलेल्या ऑस्ट्रेलियाई टीमने बांद्रा कुर्ला परिसरात सराव सामन्यात भाग घेतला. ऑस्ट्रेलिया टीम इथे सहा आणि आठ तारखेला सराव सामन्यात भाग घेतल्यानंतर १२ मार्चपासून सुरू होत असलेल्या वनडे सीरिजसाठी वडोदराला जाईल.  

मुंबईमध्ये त्रिकोणीय सीरिज

वनडे सीरिजनंतर २२ मार्चपासून मुंबईमध्ये टी-२० त्रिकोणीय सीरिज सुद्धा खेळली जाईल. यात इंग्लंड तिसरा संघ असेल. भारत ए संघाचं नेतृत्व अनुजा पाटिल करणार आहे. तिने देशासाठी २७ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया टीम आयसीसी महिला वनडे चॅम्पियनशिप सामन्यांसाठी भारत दौ-यावर येत आहे. 

६ आणि ८ तारखेला सराव सामने

हे सराव सामने सहा आणि आठ मार्चला मुंबईमध्ये खेळले जातील. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या जाणा-या वनडे सीरिजसाठी बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 

सीरिजमधून झूलन बाहेर

या सीरिजमध्ये भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीला बाहेर ठेवण्यात आलंय. ती अनफिट असल्याने तिला विश्रांती देण्यात आलीये. तिच्या जागेवर सुकन्या परिदा हिला १५ सदस्यीय संघात स्थान दिलंय. 

भारत ए टीम : अनुजा पाटिल(कर्णधार), प्रिय पूनिया, सारिका कोहली, दयालन हेमलता, नेहा तंवर, तनुश्री सरकार, निशु चौधरी, कविता पाटिल, मेघना सिंह, शांति कुमारी, नुजहत परवीन, टी.पी.कंवर, प्रिती बोस आणि एस आशा.