कोट्यावधींची संपत्ती असूनही Anushka- Virat राहणार भाडेतत्वावर? देणार इतक्या लाखांचं भाडं

Virat Kohli आणि Anushka Sharma यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. तरी देखील त्या दोघांनी इतका मोठा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असून त्याचे कारण काय आहे ते समोर आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Updated: Nov 23, 2022, 01:26 PM IST
कोट्यावधींची संपत्ती असूनही Anushka- Virat राहणार भाडेतत्वावर? देणार इतक्या लाखांचं भाडं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांची जोडी ही लोकप्रिय सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहे. अनुष्का आणि विराट हे त्यांच्या लग्झरीयस लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमीच चर्चेत असणारे विराट आणि अनुष्का आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. एकीकडे हे दोघं एक नवीन घर विकत घेण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे कोट्यावधींची संपत्ती असूनही हे भाड्याच्या घरात राहणार असल्याचे म्हटले जात आहे. 

किती आहे अनुष्का आणि विराटच्या घराचं दर महिन्याचं भाडं 

zapkey.com च्या वृत्तानुसार नुकतचं विराटनं जुहूमध्ये 1,650 स्क्वेअर फूट फ्लॅटसाठी 7.50 लाख रुपये दिले आहेत. 17 ऑक्टोबरलाच ही डील फायनल झाली. तसे, या घराचे महिन्याचे भाडे हे 2.76 लाख रुपये आहे. या फ्लॅटची खास गोष्ट म्हणजे या घराला असलेला सी व्ह्यू. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की विराट आणि अनुष्कानं भाड्यानं घेतलेला हा फ्लॅट माजी क्रिकेटपटू समरजित सिंग गायकवाड यांचा आहे, जे बडोद्याच्या राजघराण्याचे वंशज आहेत. (Virat Kohli and Anushka Sharma Living In Rented House) 

हेही वाचा : गडगंज संपत्ती तरीही पैशांवरुन वाद? Sunny Deol वर फसवणूकीचा आरोप

अनुष्का-विराट खरेदी करत आहेत कोटींचा व्हिला

दुसरीकडे, इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात विराट आणि अनुष्कानं अलिबागच्या झिराड गावात काही महिने घालवण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे इथेच राहिले आणि नंतर त्यांना ती जागा इतकी आवडली विराटनं आता आता येथे एक आलिशान व्हिला खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विराटनं संबंधित व्यक्तीशी चर्चा केली. (Anushka Sharma Virat Kohli Buy Villa At 13 Cr Rupees and liveing in a A Flat on rent For 2lakh 76 Thousand Rupees know details) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विराट आणि अनुष्काच्या या कोटींच्या घरात आहेत या सर्व सुविधा

ET नं दिलेल्या वृत्तानुसार या आलिशान 4BHK व्हिलाची किंमत 10.5 कोटी ते 13 कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात म्हटले जात आहे. या व्हिलामध्ये चार बेडरूम आहेत. दोन कार गॅरेज आहेत. 4 स्पेशल मेकअप रुम असून त्यांना कनेक्गिंग चार बाथरुम आहेत. एक टेरेस आहे. गार्ड्न आहे. प्रायव्हेट पूल आणि कामाला असणाऱ्या लोकांसाठी रहायची सोय आहे. त्या लोकांना राहण्यासाठीही मोठी जागा आहे. (what is the price of anushka sharma house?)