Arjun tendulkar : डेब्यू सामन्यात शतक ठोकलं पण पुढे काय? सेंच्युरीनंतर अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

गोवा विरूद्ध राजस्थान (Goa vs Rajasthan) या सामन्यामध्ये त्याने शतकी खेळी करत रणजी ट्रॉफीला सुरुवात केली होती. मात्र करियरला चांगली सुरुवात देणाऱ्या अर्जुनला फॉर्म कायम ठेवता आला नाही.

Updated: Jan 8, 2023, 09:26 PM IST
Arjun tendulkar : डेब्यू सामन्यात शतक ठोकलं पण पुढे काय? सेंच्युरीनंतर अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच! title=

Ranji Trophy: महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (arjun tendulkar) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) गोव्याच्या टीमकडून खेळतोय. गोवा विरूद्ध राजस्थान (Goa vs Rajasthan) या सामन्यामध्ये त्याने शतकी खेळी करत रणजी ट्रॉफीला सुरुवात केली होती. मात्र करियरला चांगली सुरुवात देणाऱ्या अर्जुनला फॉर्म कायम ठेवता आला नाही. डेब्यूनंतर सतत अर्जुन फलंदाजीच्या फ्लॉप ठरताना दिसतोय.

शतकानंतर अर्जुन तेंडुलकरचा फ्लॉप शो!

राजस्थानविरूद्ध शतकी खेळी खेळल्यानंतर झारखंडविरूद्धच्या सामन्यात अर्जुन 1 रन्सवर आऊट झाला. यानंतर कर्नाटकच्या मजबूत टीमसमोर अर्जुन पहिल्याच बॉलवर गोल्डन डक म्हणजे शून्यावर आऊट झाला. केरळविरूद्धच्या सामन्यात देखील त्याचा संघर्ष पहायला मिळाला. या सामन्यात तो अवघ्या 6 रन्सवर बाद झाला. 

अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या डेब्यू सामन्यात शतक करत त्याच्या उत्तम भविष्याचे संकेत दिले होते. मात्र एका डावाच्या खेळीनंतर अर्जुनचा फॉर्म काही पुन्हा दिसला नाही. अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर युवराज सिंगचे वडील आणि माजी भारतीय खेळाडू योगराज सिंग यांनी त्याच्या श्रेय घेतले.

योगराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनने बॅटींग शिकली होती. योगराज सिंग यांनी सांगितलं होतं की, तो अर्जुनला नेहमी पाठिंबा देणार आहे. त्याला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम माणूस बनवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र अशा परिस्थितीत अर्जुनच्या फ्लॉप शोवर योगराज सिंह यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आयपीएलमध्ये मिळणार खेळण्याची संधी

रणजी स्पर्धेतल्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये (IPL) अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. पण त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावर्षीही मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं आहे. अर्जुन तेंडुलकरची सध्याची कामगिरी पाहता आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.

2022 वर्ष अर्जुनसाठी टर्निंग पॉईंट

2022 हे वर्ष अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) च्या करियरसाठी टर्निंग पॉईंट (Terning Point) ठरलंआहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अर्जुनने चांगला खेळ दाखवला आहे. गोव्याकडून प्रथम श्रेणीत देखील त्याने उत्तम खेळ केला आहे. रणजी ट्रॉफी तसंच सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनच्या नावाची चांगली चर्चा होती. 

डेब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक

गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक ठोकलं. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरलं. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.