सचिन तेंडुलकरची ही अपूर्ण इच्छा अर्जुन करणार पूर्ण

सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वातील 'देव' मानला जातो.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 10, 2017, 05:51 PM IST
सचिन तेंडुलकरची ही अपूर्ण इच्छा अर्जुन करणार पूर्ण  title=

मुंबई : सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वातील 'देव' मानला जातो.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या या खेळाडूने क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. 

कसोटी, वन डे, टी  20 अशा तिन्ही स्वरूपातील मॅचेस खेळल्यानंतर आता सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटपासून दूर झालेल्या सचिनची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली आहे.  

सचिनची ही  इच्छा अपूर्ण  

फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरने अनेक विश्वविक्रम केले असले तरीही त्याला फलंदाजीपेक्षा गोलंदाज होण्याची इच्छा होती. सुरूवातीच्या काळामध्ये सचिन तेंडुलकरला गोलंदाज होण्याची इच्छा होती.  

बहुमोल सल्ला 

गोलंदाज होण्यासाठी सचिन मुंबईहून चैन्नईला गेला होता.  चैन्नईतील एमआरएफ पेस एकेडमीमध्ये त्याने प्रवेश घेतला. मात्र येथे ऑस्ट्रेलियन खेळाडू डेनिस लीली यांनी सचिनला गोलंदाजापेक्षा फलंदाज हो! असा सल्ला दिला. 

सचिन तेंडुलकरची उंची कमी असल्याने फलंदाजीवर त्याने अधिक लक्ष द्यावे असा सल्ला लीलींनी त्याला दिला. 

अर्जून करतोय सचिनची स्वप्नपूर्ती  

गोलंदाज होण्याची सचिन तेंडुलकरची अपूर्ण इच्छा त्याचा मुलगा अर्जुनच्या माध्यमातून पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

अंडर १९ खेळामध्ये अनेक सामन्यांमध्ये अर्जुनच्या तुफान गोलंदाजीचा अंदाज आला आहे.  

अर्जुन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला तसेच भारतीय महिला संघालाही बॉलिंग केली होती.  

नुकतीच अर्जुन तेंडुलकरच्या तुफान गोलंदाजीमुळे मुंबईला आसामवर विजय मिळवता आला आहे. त्याने ४ विकेट घेत पहिल्या डावात १५४ धावांनी विजय मिळवला होता.