या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 10, 2017, 05:51 PM IST
या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह title=

मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.

खास रिसॉर्टमध्ये विवाह

इटलीमधील टस्कनी येथील बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्टमध्ये हा विवाह पार पडणार आहे. इटलीच्या या जागेची एक खास गोष्ट आहे. हा रिसॉर्ट फक्त उन्हाळ्यात उघडला जातो पण विराट आणि अनुष्काच्या विवाहासाठी हा रिसॉर्ट डिसेंबरमध्ये खुला केला जाणार आहे.

३ जणांना आमंत्रण

विराटने त्याच्या विवाहासाठी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह यांना आमंत्रण दिलं आहे. यांच्या व्यतिरिक्त विराटचे लहानपणाचे कोच राजकुमार शर्मा यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

पाहा तो रिसॉर्ट