अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्करने जखमी झाला इंग्लडचा हा स्टार फलंदाज

 आज इंग्लड आणि लॉर्डसच्या मैदानावर साऊथ आफ्रिका आणि इंग्लड यांच्या पहिला कसोटी सामना खेळविला जात आहे पण या मॅचच्या प्रॅक्टीस सेशनमध्ये काही असे झाले की वर्तमान पत्रात याची बातमी झाली. 

Updated: Jul 6, 2017, 07:50 PM IST
 अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्करने जखमी झाला इंग्लडचा हा स्टार फलंदाज  title=

नवी दिल्ली :  आज इंग्लड आणि लॉर्डसच्या मैदानावर साऊथ आफ्रिका आणि इंग्लड यांच्या पहिला कसोटी सामना खेळविला जात आहे पण या मॅचच्या प्रॅक्टीस सेशनमध्ये काही असे झाले की वर्तमान पत्रात याची बातमी झाली. 

याच ग्राऊंडवर नेट प्रॅक्टीस करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने बॉलिंग केली. यावेळी त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टो याला आपल्या गोलंदाजीने अडचणीत आणलेच पण त्याला जखमीही केले 

जॉनी अर्जुनसमोर पहिल्यांदा खेळ होता. त्याने पहिला चेंडू टाकला आणि तो जॉनीच्या टाचेवर आदळला. जॉनीला खूप दुखू लागले. त्यामुळे त्याने नेट प्रॅक्टीस सोडली.  दरम्यान जॉनीची जखम गंभीर नव्हती त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, त्याने १० धावा केल्या. 

अर्जुन लॉर्ड्सच्या इंडोर नेट्समधील ओळखीचे नाव आहे. तो आपल्या वडिलासोबत अनेक वेळा या ठिकाणी आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेट सेशनमध्ये टीम इंडियासोबत होता. यापूर्वी त्याने भारतीय टीम आणि इंग्लंडसोबत ट्रेनिंग केली आहे. डावखुरा तेज गोलंदाज आणि फलंदाज असणारा अर्जुन मुंबई अंडर १४ आणि अंडर १६ खेळला आहे.