या मुलीसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं.

Updated: Aug 7, 2018, 05:11 PM IST
या मुलीसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर! title=

लंडन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं. या टेस्ट सीरिजमध्ये अर्जुननं ३ विकेट घेतल्या तर १४ रन केल्या आणि २ कॅच पकडले. टेस्ट सीरिजनंतर झालेल्या वनडे सीरिजमध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालेली नव्हती. त्यामुळे टेस्ट सीरिजनंतर अर्जुन इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. इंग्लंडमधले अर्जुन तेंडुलकरचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन तेंडुलकर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटसोबत दिसत आहे. अर्जुन आणि डेनियल इंग्लंडच्या एका हॉटेलमध्ये जेवत असतानाचा फोटो डॅनियलनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

डॅनियल वॅट सध्या इंग्लंडमध्ये किया सुपर लीगमध्ये सदर्न वायपर्सकडून खेळत आहे. या स्पर्धेमध्ये डॅनियलनं १६.६६ च्या सरासरीनं ६ मॅचमध्ये ९४ रन केले आहेत.

 

England women cricketers with Arjun Tendulkar at Lord's Cricket Ground #England #tendulkar #arjuntendulkar #london #DanielleWyatt #SophieEcclestone #womenscricket #lovelords

A post shared by CricFit (@cricfit) on

डॅनियल वॅटनं भारताचा कर्णधार विराट कोहलीला ट्विटरवरून प्रपोज केलं होतं. २०१४ साली विराटनं केलेल्या एका खेळीनंतर डॅनियलनं विराटला प्रपोज केलं. 

 

Both look so cute together @danniwyatt28 @arjuntendulkar24

A post shared by Virat danielleLOVE (@viratdanielle) on