Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर श्रीलंकनं महिला संघानं केला जबरदस्त Dance! Video Viral

आशिया कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकन संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे.  श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 6 गडी गमवून 121 धावा करू शकला.

Updated: Oct 13, 2022, 08:30 PM IST
Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर श्रीलंकनं महिला संघानं केला जबरदस्त Dance! Video Viral title=
Source- Twitter

Asia Cup 2022 Womens Final Match Between Indai Vs Sri Lanka: आशिया कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकन संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे.  श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 6 गडी गमवून 121 धावा करू शकला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान 3 धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानच्या निदा दारनं चेंडू तटावला देखील मात्र दुसरी धाव घेतला धावचीत झाली. त्यामुळे श्रीलंकेनं हा सामना अवघ्या एका धावेने जिंकला.

या विजयानंतर श्रीलंकन महिला संघानं  जल्लोष केला. महिला क्रिकेटपटूंनी मैदानात जबरदस्त डान्स केला. खेळाडू नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

पुरुष आशिया कप 2022 स्पर्धेत श्रीलंकेनं बाजी मारली. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून आशिया कपवर नाव कोरलं होतं. आता महिला आशिया कप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे.