India vs Pakistan:भारत-पाकिस्तान सामना ग्रुपमध्ये पाहिल्यास बसणार दंड, यूनिवर्सिटीचे फर्मान

भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यास बसणार दंड, काय आहे प्रकरण जाणून घ्या 

Bollywood Life | Updated: Aug 28, 2022, 02:08 PM IST
India vs Pakistan:भारत-पाकिस्तान सामना ग्रुपमध्ये पाहिल्यास बसणार दंड, यूनिवर्सिटीचे फर्मान title=

नवी दिल्ली :  आशिया कप 2022  (Asia Cup 2022) मध्ये आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan)  महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  या सामन्याची उत्सुकता क्रिकेट फॅन्सना लागली आहे.त्यात आता भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यास दंड बसणार आहे. एका प्रसिद्ध यूनिवर्सिटीने विद्यार्थ्यांसाठी या संदर्भातले फर्मान काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.  

यूनिवर्सिटीच्या नोटीशीत काय? 
स्टुडंट्स वेल्फेअरच्या डीनने जारी केलेल्या नोटीसमध्ये सांगितले आहे की, दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर विविध देशांमधील क्रिकेट स्पर्धा सुरू असल्याची विद्यार्थ्यांना माहिती आहेच. आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan)  यांच्यात हा सामना रंगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाला खेळ म्हणून घ्यावे आणि संस्थेत किंवा वसतिगृहात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan)   क्रिकेट सामना ग्रुपमध्ये पाहू नये. तसेच सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट करू नयेत असे निर्देश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या खोल्यांमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या खोल्यांमध्ये प्रवेश करू देऊ नका आणि गटांमध्ये सामने पाहू देऊ नका, असेही आदेश आहेत. एनआयटी-श्रीनगरने या संबंधित फर्मान काढले आहे.  

...तर विद्यार्थ्यांना दंड ठोठावणार 
एनआयटी-श्रीनगर नोटीशीत म्हणाले की, "विद्यार्थ्यांचा एक गट एखाद्या खोलीत सामना पाहत असल्याचे आढळल्यास, ज्या विद्यार्थ्यांना त्या विशिष्ट खोलीचे वाटप करण्यात आले आहे त्यांना संस्थेच्या वसतिगृहातून बाहेर काढले जाईल आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना किमान पाच दंड ठोठावला जाईल, असे सांगण्यात आले आहे.  

विद्यार्थ्यांमध्ये राडा
2016 यावर्षी T20 विश्वचषकाच्य़ा उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाला होता. यावेळी इतर राज्यातील विद्यार्थी आणि संस्थेतील स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. ज्यामुळे NIT अनेक दिवस बंद राहिली होती. हा प्रकार पुन्हा टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांसाठी फर्मान काढण्यात आले आहे.