एशिया कप : बांगलादेशचा भारतावर दणदणीत विजय

भारतीय टीमला बांगलादेशकडून ३ विकेट्सनी हार पत्करावी लागली. 

Updated: Jun 10, 2018, 05:34 PM IST
एशिया कप : बांगलादेशचा भारतावर दणदणीत विजय  title=

मुंबई : भारतीय महिला टीमचं सलग सातव्यांदा एशिया कप जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमला बांगलादेशकडून ३ विकेट्सनी हार पत्करावी लागली. बांगलादेशने ११३ रन्सचे लक्ष शेवटच्या बॉलवर मिळवलं. याचसोबत बांगलादेशने पहिल्यांदा एशिया कपवर कब्जा केला. रुमाना अहमद ही 'प्लेयर ऑफ द मॅफ' ठरली तर 'प्लेयर ऑफ द सीरीज' म्हणून हरमनप्रीत कौरला गौरविण्यात आले.  टॉस हारून बॅटींगला उतरलेल्या भारतीय टीमने कॅप्टन हरमनप्रीत कौर (५६ रन्स, ४२ बॉल्समध्ये) च्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर २० ओव्हरमध्ये ९ विकेट्सच्या बदल्याच ११२ रन्स बवनू शकला. भारताची सुरूवाच खूप खराब झाली. सलामी फलंदाज स्मृति मंधआना (७) तर मिताली राज (११) अशी पहिल्या विकेटने केवळ १२ रन्सचीच भागिदारी केली. मंधानाला कॅप्टन सलमा खातूनने रन आऊट करुन भारताला पहिला झटका दिला. ४ विकेट आणि ३२ रन्स असताना हरमनप्रीत आणि वेदा कृष्णमुर्ती (११) यांनी पाचव्या विकेटसाठी ३० रन्सची भागिदारी केली.

भारताचे ११२ रन्स 

शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर झूलन गोस्वामी (१०) आणि हरमनप्री यांच्यामधअये ३३ रन्सची भागिदारी झाली. भारताचा स्कोअर ११२ रन्सपर्यंत पोहोचला. बांगलादेशकडून खादिजा तुल कुबरा आणि रुमाना अहमदने २-२ विकेट घेतले. सलमा खातून आणि जहांआरा आलम यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाला.