ढाका : आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) थरारक झालेल्या सामन्यात हॉकी टीम इंडियाने (Hockey Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (Pakistan) विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने कांस्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली आहे. तसेच या विजयासह भारताने टॉप 3 मध्ये एंट्री घेतली आहे. हॉकी टीम इंडिया तिसऱ्या स्थानी आहे. (Asian Champions Trophy ind vs pak indian hockey team beat Pakistan by 4-3 to win bronze medal and reached to 3rd Spot)
हॉकी टीम इंडियाने ब्राँझ पदकाच्या या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 ने विजय मिळवला. अगदी अटीतटीच्या लढतीत भारताने हा विजय साकारला.
गोल केलेले खेळाडू
दरम्यान या सामन्यात टीम इंडियाकडून हरमनप्रीत सिंह, वरुन कुमार आणि आकाशदीप सिंह या तिकडीने अनुक्रमे 45, 53 आणि 57 व्या मिनिटाला गोल केलं.
तर पाकिस्तानकडून अफराजने 10 व्या, अब्दुल राणाने 33 व्या आणि अहमद नदीमने 57 व्या मिनिटाला गोल केला .
या स्पर्धेत भारताने रॉबीन राऊंडमध्ये सलग 4 सामने जिंकले होते. त्यामुळे भारत या स्पर्धेचे प्रबळ दावेदार होता. मात्र सेमीफायनलमध्ये जपानकडून पराभव पत्करावा लागल्यानं हे स्वप्न हुकलं.
An intense encounter between the two teams leading to a magnificent win for the #MenInBlue
Snaps from team 3rd/4th place clash of the Hero Men’s Asian Champions Trophy Dhaka 2021.#IndiaKaGame #HeroACT2021 pic.twitter.com/msjrfhj4Ou
— Hockey India (@TheHockeyIndia) December 22, 2021