बॉक्सिंगमध्ये भारताला सुवर्णपदक; अमित पांघलचा गोल्डन पंच

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ६७ पदके मिळवली आहेत.

Updated: Sep 1, 2018, 03:54 PM IST
बॉक्सिंगमध्ये भारताला सुवर्णपदक; अमित पांघलचा गोल्डन पंच

जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी भारताने आतापर्यंत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. बॉक्सर अमित पंघलने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर ब्रिज खेळात प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

अंतिम फेरीत २२ वर्षीय अमित पंघलने उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक विजेत्या हंसबॉय दुस्मातोवला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. अमितच्या या सुवर्णपदकाबरोबरच भारताची सुवर्णपदकांची संख्या १५ वर गेली असून भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ६७ पदके मिळवली आहेत. यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव भारतीय बॉक्सर ठरला आहे.