'एशियन गेम्स'मध्ये हिना सिद्धूला कान्स्य... भारताला १० वं पदक

चीनी शूटर कियान वांग यानं २४०.३ अंकांसोबत हे मेडल जिंकलंय

Updated: Aug 24, 2018, 12:38 PM IST
'एशियन गेम्स'मध्ये हिना सिद्धूला कान्स्य... भारताला १० वं पदक  title=

जकार्ता : स्टार शूटर हिना सिद्धूनं १८ व्या एशियन गेम्समध्ये कान्स्य पदक जिंकलंय. हिनानं १० मीटर एअर पिस्तोलमध्ये हे पदक आपल्या नावावर केलंय. यंदाच्या एशियन गेम्समधलं शुटिंगमध्ये भारताला मिळालेलं हे दहावं मेडल आहे. 

२८ वर्षांच्या हिनानं क्वालिफिकेशन राऊंडमध्ये सातव्या क्रमांकावर राहताना फायनलमध्ये जागा मिळवलीय. तिनं फायनलमध्ये आपला खेळ सुधारताना स्वत:ला तिसऱ्या स्थानावर पोहचवलंय. फायनलमध्ये तिचा स्कोअर २१९.२ राहिला. 

दक्षिण कोरियाच्या किम मिनजुंगनं २३७.२३७.६ अंकांसोबत रौप्य पदक जिंकलं. तर सुवर्ण पदक चीनच्या नावावर राहिलं. चीनी शूटर कियान वांग यानं २४०.३ अंकांसोबत हे मेडल जिंकलंय. हा गेम्स रेकॉर्डही आहे.