Rohit Sharma: क्रीझवर मी बिनडोकपणे...; सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा हे काय बोलून गेला?

Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) फलंदाजी चांगली होतेय. यावेळी त्याने अनेक मोठे शॉट खेळले असून त्यांची चर्चा होतेय. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने, तो त्याच्या फलंदाजीचा भरपूर आनंद घेत असल्याचं म्हटलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 2, 2023, 10:56 AM IST
Rohit Sharma: क्रीझवर मी बिनडोकपणे...; सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा हे काय बोलून गेला? title=

Rohit Sharma: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्रकार परिषद घेण्यात आली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) फलंदाजी चांगली होतेय. यावेळी त्याने अनेक मोठे शॉट खेळले असून त्यांची चर्चा होतेय. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने, तो त्याच्या फलंदाजीचा भरपूर आनंद घेत असल्याचं म्हटलंय. 

फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित शर्मा?

पत्रकारांशी बोलताना रोहित शर्माने ( Rohit Sharma ) सांगितलं की, ‘सध्या मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतोय. पण अर्थातच टीम आणि त्या सामन्याची परिस्थिती माझ्या डोक्यात असते. मी क्रीझवर येऊन बिनडोकपणे माझी बॅट फिरवतो असं नाही. मला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचण्यास मदत करावी लागेल. या सर्व गोष्टी माझ्या मनात सुरु असतात."

“ज्यावेळी मी डावाची सुरुवात करतो, तेव्हा स्कोर शून्य असतो. मला डावाची लय ठरवायची असते. माझ्यावर विकेट पडण्याचे दडपण नाही हा माझ्यासाठी एक फायद्याचा सौदा आहेस असं म्हणून शकता. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे खेळू शकता. प,ण गेल्या सामन्यात आम्ही पॉवर प्लेमध्ये दडपणाखाली आलो होतो. त्यानंतर आम्ही तीन विकेट गमावल्या.'' असंही रोहितने ( Rohit Sharma ) सांगितलंय

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, या वर्ल्डकपमध्ये आम्ही अनेक सामने पाहिले आहेत. त्यांना मी उलटफेर म्हणणार नाही. कारण प्रत्येक टीम जिंकण्यासाठी आलीये. प्रत्येक टीम दुसऱ्या टीमला पराभूत करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे हा सामना आम्गी सहज जिंकू शकतो असा विचार करण्यात अर्थ नाही.'' 

रोहितच्या ( Rohit Sharma ) म्हणण्यानुसार, ''वर्तमानात राहणं महत्त्वाचं असून तुमच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही विरोधी टीमचा फारसा विचार करत नाही आणि टीम म्हणून तसंच खेळाडू म्हणून आम्ही कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करतो.”