पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा (Aaustralia vs Afghanistan) 4 धावांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीचा हा सामना रंगला होता. राशिद खानच्या तुफानी खेळीने अफगाणिस्तान (Afghanistan) हा सामना जिंकेल अशी आशा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने (Aaustralia) पुनरागमन करत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर सामन्यातील अंपायर्स ट्रोल होऊ लागले आहे. कारण या सामन्यात अंपायर्सकडून एक मोठी चुक घडली आहे. या चुकीमुळे अंपायर्स ट्रोल होत आहेत.
हे ही वाचा : ...तर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये 'गेम' होणार?
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2022 मध्ये अंपायर्सच्या अनेक निर्णय़ावरून मोठा वाद झाला आहे. या अनेक निर्णयावरून ते ट्रोल देखील झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये अंपायरची चूक नसताना, अनेक प्रकरणांमध्ये अंपायरच्या चुकीमुळे टीमचे नुकसान झाले आहे. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Aaustralia vs Afghanistan) यांच्यातील सामन्यात घडला. या सामन्यात अंपायर्सकडून मोठी चुक झाली आहे. त्यामुळे आता खराब अपायरींगवरून पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
हे ही वाचा :महेंद्रसिंह धोनी CSK साठी पुन्हा ठरला संकटमोचक, 'तो' वाद मिटवलाच
अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Aaustralia vs Afghanistan) प्रथम फलंदाजीस उतरली होती. तर अफगाणिस्तानची बॉलिंग होती. या ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथ्या ओव्हरमध्ये नवीन-उल-हक गोलंदाजी करत होता. त्याने त्याच्या ओव्हरमध्ये 5 च बॉल टाकले. सहावा बॉल टाकलाच नाही आणि त्याने 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अंपायर्सनी ओव्हर संपल्याचे घोषित केले. ही घटना कोणाच्याही निदर्शनास आली नाही. मात्र आता सामना संपल्यानंतर अंपायर्सवर टीका होतेय.
हे ही वाचा : सुर्यकुमार यादवची Love Story आहे खुपच खास, रोमँटीक Photo सह जाणून घ्या
नवीन-उल-हकने त्याच्या ओव्हरमध्ये 5 बॉल टाकल्या होत्या. आणि अंपायरने ओव्हर संपल्याचे घोषित केले होते. त्यावेळी मैदानात कोणालाच ही चुक दिसून आली नाही. मात्र आता ती चुक दिसण्यात आली आहे. सोशल मीडियावर स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत आणि अंपायर्सना ट्रोल केले जात आहे.
दरम्यान याआधी देखील टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) अंपायरिंगवर टीका झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अंपायरने शेवटच्या ओव्हरमध्ये नवाजचा एक चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला होता, तर पाकिस्तानी खेळाडूंनी तो नो बॉल नसल्याचे सांगितले होते. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात विराट कोहलीवर बनावट क्षेत्ररक्षणाचे आरोपही झाले आहेत, पण पंचांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
दरम्यान या टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) खराब अंपायरिंगवरून अनेक संघाना मोठे नुकसान सहन करावे लागले आहेत. त्यामुळे अंपायरिंगमध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा क्रिकेट फॅन्स करत आहेत.