पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) सुपर 12 मधील शेवटचा सामना दुबळ्या झिंबाब्वेशी (Zimbabwe) होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया सेमी फायनलची शर्यंत जिंकणार आहे. मात्र जर या सामन्यात पावसाने गेम केला तर टीम इंडियासाठी सेमी फायनलपर्यंत (Semi Final) पोहोचणे फारच अवघड जाणार आहे. तसेच या घटनेचा फायदा पाकिस्तानला देखील होणार आहे. त्यामुळे या एका घटनेमुळे पॉईंट टेबलच गणित कसे बदलणार आहे, हे जाणून घेऊयात.
येत्या रविवारी 6 नोव्हेंबरला टीम इंडियाचा (Team India) सुपर 12 मधील शेवटचा सामना दुबळ्या झिंबाब्वेशी (Zimbabwe) होणार आहे. या सामन्यात झिंबाब्वेला दुबळं समजण टीम इंडियाला महागात पडू शकत. कारण टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने असंच झिंबाब्वेला दुबळं समजल आणि त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे पाकिस्तानने केलेली ही चुक टीम इंडियाने टाळली तर त्यांचा विजय निश्चित आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आतापर्यंत पावसामुळे अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. हे निकाल कोणत्याच संघाला अपेक्षित नव्हते. मात्र हे निकाल लागले आहेत. असाच धक्कादायक निकाल टीम इंडियाचा (Team India) लागण्याची शक्यता आहे. कारण 6 नोव्हेंबरच्या झिंबाब्वे (Zimbabwe) विरूद्ध सामन्यात जर पाऊस पडला तर टीम इंडियाचा गेम होण्याची शक्यता आहे. कारण या पावसामुळे टीम इंडियाचा सेमी फायनल पोहोचण्याच स्वप्न अपुर्ण राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ग्रुप 2 मधील सर्वंच संघाचे 4 सामने पार पडले आहेत. या सामन्यात टीम इंडिया 6 गुणांसह टॉपवर आहे. मात्र टीम इंडियाचा नेट रन रेट खुपच कमी आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट +0.730 आहे. तर टीम इंडियापेक्षा (Team India) साऊथ आफ्रीका +1.441 आणि पाकिस्तान +1.117 नेट रन रेट खुपच चांगला आहे. त्यामुळे जर टीम इंडिया विरूद्घ झिंबाब्वे सामन्यात पाऊस पडला तर टीम इंडियासाठी खुप अवघड होणार आहे.
टीम इंडिया आणि झिंबाब्वे (India vs Zimbabwe) विरूद्ध सामन्यात जर पाऊस पडला तर दोन्ही संघाना एक-एक गुण वाटून दिला जाईल. यामुळे टीम इंडियाचे (Team India) 7 गुण होतील. आणि या गुणांसह टीम इंडिया सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. दुसरीकडे जर दक्षिण आफ्रिकेने आणि पाकिस्तानने आपआपले सामने जिंकले तरी टीम इंडिया 7 गुणांसह टॉपवर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने (South Africa) सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात जरी नेदरलँड्सचा पराभव केला तरी त्यांचे एकूण 7 गुण होतील. म्हणजेच ते गुणांच्या बाबतीत टीम इंडियाच्या बरोबरीत येतील. आणि जर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तर त्यांना आणखीण 2 गुण मिळतील. आणि त्याचे एकूण गुण 6 होतील. त्यामुळे नेट रन रेटची गरजच भासणार नाही. प्रत्येकी 7 गुण असणारे दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.
आता टीम इंडियाचा झिंबाब्वे विरूद्धचा (India vs Zimbabwe) सामना व्यवस्थित पार पडतो की पावसामुळे खोळंबा होतो? हे सामन्याच्या दिवशीच कळणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.