सिडनी : ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजसाठी टीमची घोषणा केली आहे. फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आणि स्पिनर नॅथन लायनला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ नोव्हेंबरला गोल्ड कोस्टमध्ये एकमेव टी-२० मॅच खेळेल. तर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताविरुद्धच्या सीरिजला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
स्टार्क आणि लायनबरोबरच ऑस्ट्रेलियानं पीटर सीडल आणि ऑलराऊंडर मिचेल मार्शलाही आराम देण्यात आलाय. तर मार्कस स्टॉयनीस आणि जेसन बेहरनडॉर्फचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आराम देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिली आहे.
युएईच्या दौऱ्यानंतर आम्हाला मायदेशात बरच क्रिकेट खेळायचं आहे. यानंतर वर्ल्ड कप आणि अॅशेस सीरिज आहे. त्यामुळे आगामी क्रिकेट लक्षात घेता आम्ही टीमचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं लँगर म्हणाले.
अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स कारे, अॅश्टन अगर, जेसन बेहरनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, क्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमॅट, डी आर्सी शॉर्ट, बिली स्टेनलेक, मार्कस स्टॉयनीस, एन्ड्र्यू टाय, अॅडम झाम्पा
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद