डर्बीच्या मैदानावर हरमनप्रीतनचे वादळ, ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान

डर्बीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज हरमनप्रीत कौरचे वादळ पाहायला मिळाले. या वादळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती वाट लागली. 

Updated: Jul 20, 2017, 10:27 PM IST
डर्बीच्या मैदानावर हरमनप्रीतनचे वादळ, ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान title=

डर्बी : डर्बीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज हरमनप्रीत कौरचे वादळ पाहायला मिळाले. या वादळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती वाट लागली. 

हरमनप्रीतच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २८१ धावा केल्या. तिने ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा चोपल्या. तिने २० चौकार आणि ७ षटकार खेचले.

सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना ४२ षटकांचा खेळवण्यात येतोय. ४२ षटकांत भारताने ४ बाद २८१ धावा केल्या. मिताली राजने ३६ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने २५ धावा केल्या. वेदा कृष्णमूर्ती १६ धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी २८२ धावा हव्यात.