गुवाहाटी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतीय बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. २० ओव्हरमध्ये भारतानं ११८ रन्स केल्या. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला दोन धक्के बसले. त्यानंतर सातत्यानं भारतानं विकेट्स गमावल्या.
ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर झम्पाला दोन विकेट घेण्यात यश आलं. कुल्टरनाईल, टाय आणि स्टॉयनिसला प्रत्येकी एक विकेट मिळाली. केदार जाधवनं सर्वाधिक २७ रन्स केले तर हार्दिक पांड्या २५ रन्स करून आऊट झाला.