सचिन तेंडुलकरने पकडली चहाची किटली, फॅन्स म्हणाले...

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. तो नेहमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असतो. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 10, 2017, 08:03 PM IST
 सचिन तेंडुलकरने पकडली चहाची किटली, फॅन्स म्हणाले...

नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. तो नेहमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असतो. 

असा एक फोटो सचिनने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत त्याने हातात चहाची किटली आणि दुसऱ्या हातातील ग्लासमध्ये चहा टाकताना दिसत आहे. 

सचिन हा फोटो टाकल्यावर या फोटोला लाइक करणे फॅन्सने सुरू केले आहे. आता हे लाइक्स पाऊणे दोन लाखांपर्यंत पोहचले आहेत. सचिनने या फोटोसोबत लिहिले की रिटायरमेंटनंतर टी टाइम, आता कोणाला नव्या चेंडूचा सामना करण्याची किंवा नॉट आऊट राहण्याची चिंता करावी लागत नाही. सचिनच्या या फोटोवर कमेंट्ससुद्धा मजेदार आहे. 

 

After retirement, at Tea Time one doesn't have to worry about facing the new ball and remaining not out  #10Ten I like my chai kadak. Share with me on @100masterblaster App fanwall, how do you like your chai!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 

काही जण या फोटोला पसंती देत आहेत तर काही जण या फोटोवर म्हणत आहे की सर लवकर पीएम व्हा. एकाने म्हटले आहे की काँग्रेसमुक्त भारतासाठी भाजपमध्ये सामील व्हा. एकाने म्हटले की मोदींच्या पाऊलावर पाऊल टाकताहेत का. एकाने म्हटले सर ग्राऊंड मिस करताहेत का. एकाने म्हटले चायवाला म्हणजे पुढील पंतप्रधान...