Glenn Maxwells Net Worth: भारतात विश्वचषक स्पर्धा 2023चा थरार रंगत आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलने एकहाती विजय खेचून आणला. 128 चेंडूमध्ये 201 नाबाद धावा काढत कांगारूंना विजय मिळवून दिला. मॅक्सवेलच्या या तुफान खेळीनंतर सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. गुगलवरही मॅक्सवेलबाबत सर्च केले जात आहे. मॅक्सवेलच्या खेळीबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेल सध्या चर्चेत आहे. दिग्गज खेळाडूंनीही मॅक्सवेलचे कौतुक करत ही विश्वचषकातील आत्तापर्यंतची सर्वात उत्तम खेळी असल्याचे म्हटलं आहे. अशातच गुगलवर मॅक्सवेलची कमाई किती याबाबतही सर्च केले जात आहे. मॅक्सवेल वर्षाला किती कमावतो व महिन्याला त्याचा किती पगार आहे, हे सर्व जाणून घेऊया.
ग्लेन मॅक्सवेल गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळतोय. इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएलमधून तो सर्वाधिक कमाई करतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया क्रिकेट, आयपीएल, जाहिराती, गुंतवणूक आणि प्रॉपर्टीतूनही कमाई करतो. 2023मध्ये ग्लेन मॅक्सवेलची एकूण कमाई ही भारतीय रुपयांनुसार 98 कोटी आहे.
मॅक्सवेल महिन्याला 1.50 कोटी कमावतो तर त्याची वार्षिक कमाई 18 कोटी इतकी आहे. यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि बीबीएलकडून होणाऱ्या कमाईचाही समावेश आहे. मॅक्सवेलला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून प्रति वनडे सामन्यासाठी 8.5 लाख रुपये तर, टी -20 सामन्यात 5.6 लाख आणि प्रति टेस्ट मॅच 11 लाख रुपये मिळतात.
आयपीएलच्या 14व्या हंगामात आरसीबीने मॅक्सवेलवर 11 कोटींची बोली लावली होती. आतापर्यंत आयपीएलच्या झालेल्या सर्व 24 हंगामात मॅक्सवेलने 63 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आत्तापर्यंत मॅक्सवेल मुंबई इंडियन्स, दिल्ली डेयरडेविल्स, किंग्स XL पंजाब, रॉयल चैंलेजर बंगलोर साठी खेळला आहे.
मॅक्सवेलची पत्नी मिनी रमण ही भारतीय वंशाची असून ती मुळची दक्षिण भारतातील आहे. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मॅक्सवेलने विनीसोबत 2022मध्ये हिंदू रिती रिवाजानुसार लग्न केले होते. अलीकडेच सप्टेंबर महिन्यात त्यांना एक मुलगा देखील झाला आहे.
जवळपास शंभक कोटींचे नेटवर्थ असलेल्या ग्लॅन मॅक्सवेलकडे अनेक अलिशान कारची कलेक्शन आहे. मॅक्सवेलकडे मस्टँग असून त्याची किंमत 1 कोटींच्या घरात आहे. त्याचबरोबर बीएमडब्लू असून त्यांची किंमत 80 लाख आहे.