close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पहिली टी-२० : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, भारताकडून मयांक मार्कंडेचं पदार्पण

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Feb 24, 2019, 06:48 PM IST
पहिली टी-२० : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, भारताकडून मयांक मार्कंडेचं पदार्पण

विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारताची ही शेवटची टी-२० आणि वनडे सीरिज आहे. या सीरिजच्या पार्श्वभूमीवरच वर्ल्ड कपसाठीच्या टीमची निवड होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताकडून लेग स्पिनर मयंक मार्कंडेची निवड झाली आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना मयंक प्रकाशझोतात आला. याचबरोबर विराट कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. शिखर धवनला मात्र अंतिम-११ खेळाडूंमध्ये जागा मिळाली नाही.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, उमेश यादव, मयंक मार्कंडे, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच, डाआर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, एश्टन टर्नर, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स, जे रिचर्डसन, जेसन बेहरेनड्रॉफ, एडम झम्पा

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा