Cameron Green Kidney Issue : मूत्रपिंड म्हणजे किडनी रक्त फिल्टर करते, म्हणून या अवयवाशिवाय जगणे अशक्य होते. जेव्हा किडनी काम करणे थांबवते तेव्हा रक्तामध्ये विषारी पदार्थ वाढू लागतात. हे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात आणि ते निकामी होतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अशा परिस्थितीचा सामना करूनही चांगला खेळत आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला जन्मजात मूत्रपिंडाचा आजार आहे. त्याची किडनी सामान्य माणसाप्रमाणे रक्त स्वच्छ करत नाही. त्याच्या मूत्रपिंडाचे कार्य केवळ 60 टक्के चालू असून आता आजार स्टेज 2 मध्ये आहे.
मुलाखतीत कॅमेरॉन ग्रीनने पुढे सांगितले की, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी भाकित केले होते की, तो फक्त 12 वर्षे जगतील. पण सुदैवाने आज मी २४ वर्षांचा आहे आणि चांगले क्रिकेट खेळत आहे. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडद्वारे हा आजार शोधला. माझी उंचीही कमी असेल असे त्याने सांगितले होते, पण आज मी ६ फूट ६ इंच उंच आहे.
अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराचे पाच टप्पे आहेत. ज्यामध्ये पाचवा सर्वात धोकादायक आहे. यामध्ये डायलिसिस किंवा प्रत्यारोपण करावे लागते. पण योग्य जीवनशैली आणि सावधगिरीच्या मदतीने तो स्टेज 2 पर्यंत स्वतःला मर्यादित करू शकला आहे. औषधे आणि निरोगी जीवनशैलीमुळे किडनीचे कार्य अधिक चांगल्यापद्धतीने सुधारु शकते.
NIDDK माहिती प्रदान करते की जेव्हा मूत्रपिंड खराब होतात आणि सामान्यपणे रक्त फिल्टर करू शकत नाहीत, तेव्हा त्याला क्रॉनिक किडनी रोग म्हणतात. जन्मजात असण्याबरोबरच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा लोकांना या आजाराचा धोका असतो.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)