मुंबई: देशात कोरोनाची दिवसेंदिवस वेगानं वाढणारी आकडेवारी चिंताजनक आहे. क्रिकेट विश्वावरही कोरोनाचं संकट आहे. त्यामध्ये सर्व काळजी घेऊन IPL सुरू आहे. आयपीएलसाठी खेळाडूंनी कडक शिस्तीत बायो बबलमध्ये राहावं लागत आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिनला लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या घरी जाण्याची घाई लागली आहे. ख्रिस लिनने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला चार्टर प्लेनची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
भारतात वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया देशात एन्ट्री बंद केली जाण्याची शक्यता असल्याने IPLमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. लिनने न्यूज कॉर्प मीडियाला सांगितले, 'मला माहिती आहे की लोक आपल्यापेक्षा खूपच वाईट परिस्थितीतून जात आहेत, पण आमचा बायो बबलही खूप शिस्तबद्ध आणि कठीण आहे.'
'पुढील आठवड्यात आम्हाला कोरोनाची लस दिली जाईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी ही विनंती केली आहे.'
लिन याने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया आयपीएल कराराच्या 10 टक्के क्रिकेट घेते आणि यावर्षी विशेष विमानांवर खर्च त्यातून करावा अशी विनंती देखील त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील केन रिचर्डसनस आणि एडम झम्पा तर राजस्थान रॉयल्स संघातील एन्ड्रयू टाय स्वदेशी परतले आहेत. तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ देखील IPLमधून माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
30 मे पर्यंत IPLचे सामने खेळवले जात आहे. 23 मेपर्यंत लीन संपेल आणि त्यानंतर 25 आणि 28 मे दरम्यान सेमीफायनल सामने खेळले जाणार आहे. 30 मेला अंतिम सामना खेळला जाणार नाही. ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू IPLमध्ये खेळत आहेत.