Axar Patel catch ind vs sl 2nd ODI Match : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये एका खेळाडूने पकडलेल्या कॅचमुळे सर्वांना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण झाली असावी. ईडन गार्डनवरच्या मैदानावर श्रीलंकेच्या खेळाडूला अफलातून कॅच पकडत तंबूचा मार्ग दाखवला आहे. श्रीलंकेच्या चमिका करूणारत्नेला पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागलं. (Axar Patel catch ind vs sl 2nd ODI Match latest marathi sport news)
कोणी पकडला कॅच?
भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने हा कमाल कॅच पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षर प्रत्येक सामन्यामध्ये काहीना काही करिष्मा दाखवताना दिसत आहे. टी-20 सामन्यातील आक्रमक खेळी, सुर्यकुमार यादवने शतक केलं त्या सामन्यातही अक्षरने छोटेखानी आक्रमक खेळी केली होती.
उमरान मलिक बॉलिंग करत असताना श्रीलंकेचा चमिका करूणारत्नेने पॉइंटच्या दिशेने बॉल मारला, वेगाने बॉल जात असताना अक्षर पॉईंटवर उभा होता. अक्षरने चपळाईने डाय मारत हा कॅच घेतला. कॅच पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी खेळाडू युवराज सिंहनेही फिल्डिंगवेळी असे अनेक कॅच पकडत विरोधी संघाच्या मोठ-मोठ्या फलंदाजांना माघारी धाडलं होतं. अक्षरनेही खतरनाक कॅच पकडत खेळाडूला बाद केलं, त्याने एकूण या सामन्यामध्ये तीन कॅच घेतले.
Sharp catch alert @akshar2026 dives to his left and takes a fine catch as @umran_malik_01 gets his second wicket#TeamIndia | #INDvSL | @mastercardindia pic.twitter.com/R4bJoPXNM3
— BCCI (@BCCI) January 12, 2023
सामन्याचे अपडेट
टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर श्रीलंका (india vs sri lanka) संघाने शरणागती पत्करली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 40 ओव्हर आधीच 215 धावा करून ऑल आऊट झाला. श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा नुवांदु फर्नांडो याने केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. तर उमरान मलिकने (Umran Malik) 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.