मुहूर्त ठरला! बॅडमिंटन स्टार 'या' दिवशी सुपरस्टारसोबत चढणार बोहल्यावर

बॅडमिंटन स्टार ज्वाला सुपरस्टारशी लगीनगाठ बांधणार आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. 

Updated: Apr 14, 2021, 12:08 PM IST
मुहूर्त ठरला! बॅडमिंटन स्टार 'या' दिवशी सुपरस्टारसोबत चढणार बोहल्यावर

मुंबई: भारताची स्टार बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि सुपरस्टार लग्न करणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. स्टार बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा तमिळमधील सुपस्टार  विष्णू विशालसोबत लगीनगाठ बांधणार आहे.

गेल्या वर्षी या दोघांनीही लग्नाची बातमी दिली होती. त्यानंतर लवकरच तारीख जाहीर करू असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे मुहूर्त ठरला असून 22 एप्रिलला दोघंही विवाह करण्यार असल्य़ाची माहिती मिळाली आहे. ज्वालाने सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका अपलोड करून याबाबत माहिती दिली आहे. 

दोघांचे कुटुंबीय आणि काही खास लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आयुष्य हा एक प्रवास आहे. त्यावर विश्वास ठेवा त्याचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा असं कॅप्शन विष्णूने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विष्णू विशाल कोण आहे?

विष्णू विशाल हा तमिळ सिनेमांमधील एक मोठा सुपरस्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीर यष्टीमुळे अनेकदा चर्चेत असतो. ज्वाला गुट्टा त्याच्या 'अरण्या' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नेहमीच त्याच्यासोबत होती असंही विष्णूने माहिती दिली होती.