'युवराज सिंग भारताची कमजोर कडी'

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.

Updated: Jun 15, 2017, 07:08 PM IST
'युवराज सिंग भारताची कमजोर कडी' title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. युवराज सिंग हा भारतीय संघातला कमजोर खेळाडू असल्याचं बांग्लादेश संघाला वाटत आहे. फिल्डिंगमध्ये भारतीय संघापेक्षा बांग्लादेशचा संघ चांगला असल्याचं वक्तव्य बांग्लादेशचा कोच चंदिका हथरुसिंहानी केलं आहे.

बांग्लादेशचा संघ हा भारतापेक्षा जास्त संतुलित असल्याचंही हथरुसिंहाचं म्हणणं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे. भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी बांग्लादेशचा डाव सावरला.

तमीम आणि मुशफिकूरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.  तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तर मुशफिकूर रहीमनं ८५ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. कॅप्टन मशरफी मोर्तजानं शेवटी फटकेबाजी करून बांग्लादेशला २६४/७ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.