'या' आक्रमक फलंदाजाचा तडाखा, एकाच सामन्यात खेचले तब्बल 18 सिक्स, कोण आहे तो?

क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसंच ते रेकॉर्ड ब्रेकही होतात. टी 20 क्रिकेट हा फलंदाजांचा गेम समजला जातो, जिथे फक्त गोलंदाजांना धु धु धुतलं जातं.   

Updated: Dec 17, 2021, 08:25 PM IST
'या' आक्रमक फलंदाजाचा तडाखा, एकाच सामन्यात खेचले तब्बल 18 सिक्स, कोण आहे तो?  title=

मुंबई : क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसंच ते रेकॉर्ड ब्रेकही होतात. टी 20 क्रिकेट हा फलंदाजांचा गेम समजला जातो, जिथे फक्त गोलंदाजांना धु धु धुतलं जातं. वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल (Chris Gayle) हा गोलंदाजाचा कर्दनकाळ समजला जातो. खणखणीत आणि लांब सिक्स मारण्यासाठी गेल ओळखला जातो. गेलला ज्यासाठी ओळखलं जातं, तसाच कारनामा त्याने पुन्हा करुन दाखवला आहे. गेलने एका सामन्यात 18 सिक्स मारण्याचा पराक्रम केला आहे. (Bangladesh Premier League DD vs RR Rangpur Riders batsman chris gayle hit 18 sixes in an innings against Dhaka Dynamites) 
 
गेलची ऐतिहासिक कामगिरी 

गेलने एका सामन्यात अवघ्या 69 चेंडूत 146 धावा चोपल्या. यामध्ये 18 खणखीत सिक्स (Most Sixex In an Innigs) आणि 5 रंपाट फोर मारले होते. म्हणजे गेलने खडेखडे सिक्स आणि चौकारांच्या माध्यमातून 128 धावा चोपल्या . त्याच्या या तुफानी खेळीने गेलच्या संघाचा 57 धावांनी विजय झाला.     

गेलने बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) स्पर्धेत (Rangpur Riders) रंगपूर रायडर्सकडून खेळताना ढाका डायनामिक (Dhaka Dynamites) विरुद्ध ही अफलातून खेळी केली होती. हा सामना 12 डिसेंबर 2017 ला खेळवण्यात आला होता. 

गेलने केलेल्या या वादळी खेळीच्या जोरावर रंगपूरने रायडर्सने ढाका डायनामिकचा 57 धावांनी पराभव केला होता. रंगपूरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या होत्या. तर ढाकाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 149 धावाच करता आल्या होत्या.  

स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक

गेलला टी 20 किंग काय म्हंटलं जातं, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय. त्याने या 18 खणखणीत सिक्सनंतर चक्क स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गेलने आयपीएल 2013 मध्ये बंगळुरुकडून खेळताना पुण्याविरुद्ध 17 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने 175 धावा केल्या होत्या.    

गेलनंतर एका डावात सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय

दरम्यान ख्रिस गेलनंतर एका डावात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम हा भारतीय खेळाडूच्या नावे आहे. पुनीत बिष्ट (Punit Bishth) असं या फलंदाजाचं नाव आहे. पुनीत हा स्थानिक क्रिकेटमध्ये मेघालयचं प्रतिनिधित्व करतो.

पुनीतने 2021 च्या सुरुवातीला जानेवारीत मिजोराम विरुद्ध 51 चेंडूत 146 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 17 उत्तुंग षटकार खेचले होते. तसेच 6 चौकार ही मारले होते.