close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 14, 2018, 07:24 PM IST
टी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला

कोलंबो : भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये एक बदल करण्यात आलाय. जयदेव उनाडकटऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरला आहे.

बांग्लादेशचा पराभव केल्यानंतर भारत या ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये पोहोचेल. या सीरिजमधली श्रीलंकेविरुद्धची पहिली मॅच भारतानं गमावली यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. या दोन विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. तर बांग्लादेशनंही मागच्या मॅचमध्ये श्रीलंकेला धूळ चारली होती

टीममध्ये या खेळाडूंना संधी

रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल.राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा