कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल. बांग्लादेशचा पराभव केल्यानंतर भारत या ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये पोहोचेल. या सीरिजमधली श्रीलंकेविरुद्धची पहिली मॅच भारतानं गमावली यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. या दोन विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. तर बांग्लादेशनंही मागच्या मॅचमध्ये श्रीलंकेला धूळ चारली होती.
हार्दिक पांड्याऐवजी टीममध्ये संधी मिळालेला ऑल राऊंडर विजय शंकर चांगली कामगिरी करत आहे. तर फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरनंही मागच्या मॅचमध्ये चार विकेट घेतल्या. दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज आणि अक्सर पटेलला अजूनही संधी मिळालेली नाही.
भारतीय बॅट्समनची कामगिरी पाहिली तर रोहित शर्माला अजूनही सूर गवसलेला नाही. तर शिखर धवन, सुरेश रैना चांगली बॅटिंग करत आहेत. मागच्या मॅचमध्ये मनिष पांडे आणि दिनेश कार्तिकनं मागची मॅच भारताला जिंकवून दिली आहे.
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत