मुंबई : ज्याची भीती होती अखेर तेच घडलं आयपीएलमध्ये कोरोना घुसला आहे. दिल्ली टीममधून 5 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफ आहेत. संपूर्ण टीमला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय मार्शला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दिल्ली विरुद्ध पंजाब 20 एप्रिल रोजी सामना पुण्यात होणार होता. ही मॅच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होती.
बीसीसीआयने या सामन्याचं ठिकाण बदलंल आहे. पुण्याऐवजी मुंबईतील सीसीआयच्या बेब्रॉन स्टेडियममधिये सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या गोटात चौघांना कोरोना झाल्यानंतर आयपीएल रद्द करावा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली, अखेर बीसीसीआयने तो निर्णय घेतलाच.
त्याऐवजी आता BCCI ने सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने हा सामना ब्रेबॉर्नवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याआधी खेळाडूंची कोरोना चाचणी होणार असून त्यानंतरच सामना खेळवण्यात येईल.
NEWS BCCI announces release of Request for Proposal for Staging the Closing Ceremony of IPL 2022. #TATAIPL
More Details https://t.co/COqBqByttl
— BCCI (@BCCI) April 16, 2022