मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडू आणि त्यासोबात काही स्टार खेळाडूंनी दमदार कामगिरी दाखवली आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं या खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. 5 स्पिनर्सना यावेळी टीम इंडियात संधी मिळू शकते. त्यामध्ये प्रसिद्ध कुलचा जोडीचाही समावेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवची जोडी फुटली. त्यांना एकत्र टीममधून खेळण्याची संधी फार क्वचित मिळाली. आता या दोघांनीही टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकत्र टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळू शकते.
आयपीएलमध्ये कुलदीप आणि चहलची कामगिरी खूपच उत्तम आहे. त्यामुळे या दोघांनाही टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुलदीपने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यात 24 धावा केल्या तर 11 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीपने 35 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. तर युजवेंद्र चहलने कोलकाता विरुद्ध सामन्यात 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. युजवेंद्रने 6 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.
माजी भारतीय क्रिकेटर लालचंद राजपूत यांनी मोठं भाकीत केलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई यांना संधी मिळू शकते.