मुंबई : भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. अनेक मुलांचं तसंच मुलींचं स्वप्न असतं की, आपण क्रिकेटर बनावं. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करून अनेक युवा खेळाडू टीम इंडियामध्ये एन्ट्री घेतात. अशा परिस्थितीत सिलेक्टर्स खराब खेळ खेळणाऱ्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. दरम्यान सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत ज्यांना सिलेक्टर्सने टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
टीम इंडियाची दुसरी वॉल म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सिलेक्टर्सने टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गेल्या काही सामन्यांपासून पुजारा चांगला खेळ करू शकत नव्हता. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध तो पूर्णपणे फ्लॉप राहिला. यानंतर त्याच्या धिम्या गतीच्या फलंदाजीवर टीका होऊ लागल्या. अखेरीस श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये बीसीसीआयने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
न्यूझीलंडविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या अंजिक्य रहाणेला पुढच्याच सामन्यात बाहेर बसवण्यात आलं. तेव्हापासून त्याच्या करियरला ब्रेक लागला आहे. रहाणे देखील गेल्या काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. गेल्या 2 वर्षांपासून त्याने एकंही शतक झळकावलेलं नाही. त्यामुळे अखेरी बीसीसीआयने निर्णय घेत त्याला श्रीलंकेच्या सिरीजविरूद्ध बाहेरचा रस्ता दाखवला.
अजून एक असा गोलंदाज आहे ज्याला श्रीलंकेविरूद्ध संधी देण्यात आली नाही. हा गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये देखील इशांतला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मुळात इशांत सिलेक्टर्सची पहिली पसंती नाहीये. ज्यावेळी एखादा गोलंदाज जखमी होतो तेव्हाच त्याला टीममध्ये संधी देण्यात येते.