मुंबई: IPL 2021चे उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहेत. या कालावधीमध्ये IPLचे उर्वरित सामने ठेवल्यानं खेळाडूंचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा खेळाडूंना जास्त होण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये IPLसाठी कोणतेही बदल होणार नाहीत असं इंग्लंड बोर्डनं आधीच स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे इंग्लंडचे खेळाडू ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहेत. याशिवाय बांग्लादेश दौऱ्याची तयारी देखील करायची आहे.
इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जे खेळाडू UAEमध्ये उर्वरित IPL 2021 सामन्यांसाठी येणार नाहीत त्यांना नियमांनुसार पूर्ण पैसे मिळणार नाही. उर्वरित खेळाडूंना प्रो रोटा आधारावर (प्रमाणानुसार) पैसे दिले जातील.
जर हे खेळाडू उर्वरित टूर्नामेंटमध्ये खेळायला आले नाहीत तर त्यांचा पगार कापला जाणार असल्याचं BCCIच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. IPLचे संघ BCCIचे अख्यत्यारित येतात त्यामुळे BCCI हा नियम सर्व विदेशी खेळाडूंसाठी लागू करणार आहे. त्यामुळे आता इंग्लंड बोर्ड आपल्या खेळाडूंना IPL2021च्या उर्वरित सामन्यांसाठी पाठवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या या नियमातून इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सर्वाधिक त्रास होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे संघ मालिका खेळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत असं इंग्लंड बोर्डच्या अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
बेन स्टोक्स, जय रिचर्डसन, काईल जेम्सन, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि राशिद खान यांचं IPLमध्ये खेळणं सध्याच्या परिस्थितीत तरी कठीण वाटत आहे. मात्र या संदर्भात आता काय निर्णय होणार ते येत्या दिवसांमध्ये अधिक स्पष्ट होऊ शकेल.