असं आहे मोहम्मद शमीचं सुंदर फॉर्महाऊस, कोटींच्या घरात आहे किंमत

 लॉकडाऊनमध्ये शमीने केला होता येथे जोरदार सराव

Updated: May 21, 2021, 10:33 PM IST
असं आहे मोहम्मद शमीचं सुंदर फॉर्महाऊस, कोटींच्या घरात आहे किंमत title=

मुंबई : इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा महत्त्वाचा भाग आहे. या दौर्‍यावर न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि 5 सामन्यांची भारत-इंग्लंड कसोटी मालिका होणार आहे.

शमीचा फार्म हाऊस

कोरोना व्हायरसचा कहर सुरु असताना आयपीएलमध्ये ही कोरोनाचा शिरकाव झाला. ज्यामुळे बीसीसीआयने आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यानंतर अमरोहा येथे पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी परतला. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फार्म हाऊसचा एक फोटो शेअर केला आहे.

मोहम्मद शमीचे हे फार्म हाऊस यूपीच्या अमरोहा जिल्ह्यातील अलीनगर भागात आहे. हे दीडशे बीघा क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची किंमत 12 ते 15 कोटी रुपयांदरम्यान आहे. गेल्या वर्षी लॉकडाउन जाहीर झाले तेव्हा शमीने येथे जोरदार सराव केला. भुवनेश्वर कुमार आणि सुरेश रैनाही या फार्म हाऊसमध्ये सराव करण्यासाठी आले होते.