VIDEO | युवराज, पोलार्डनंतर आणखी एका फलंदाजाचा कारनामा, ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स

क्रिकेट विश्वाला आणखी एक नवा सिक्सर किंग भेटला आहे.

Updated: May 21, 2021, 10:23 PM IST
VIDEO | युवराज, पोलार्डनंतर आणखी एका फलंदाजाचा कारनामा, ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स title=

मुंबई : आतापर्यंत एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये मोजक्याच फलंदाजांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत युवराज सिंहने हा पराक्रम केला आहे. क्रिकेट विश्वाला आणखी एक नवा सिक्सर किंग भेटला आहे. विशेष म्हणजे या फलंदाजाने चक्क टी 10 लीग स्पर्धेत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स फटकावण्याची कामगिरी केली आहे. अरिथरन वसीकरण (Aritharan Vaseekaran) या भारतीय फलंदाजाने ही शानदार कामगिरी केली आहे. (ECS T10 League Bayer Uerdingen Boosters batsman Aritharan Vaseekaran hit 6 sixes in 1 over on Ayush Sharma bowling against Koln Challengers)  

वसीकरणचा तडाखा 

यूरोपियन क्रिकेट सीरीज (ECS T10) या स्पर्धेतील 17 वा सामना बायर उर्डिनजेन बूस्टर (Bayer Uerdingen Boosters) विरुद्ध कोलन चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात अरिथरनने ही कामगिरी केली. अरिथरनने सामन्यातील 5 व्या ओव्हरमध्ये हा कारनामा केला. कोलन चॅलेंजर्सकडून (Koln Challengers) पेसर आयुष शर्मा (Ayush Sharma) 5 वी ओव्हर टाकायला आला. अरिथरनने या ओव्हरमधील 6 चेंडूत खणखणीत 6 सिक्स लगावले. वसीकरनने 25 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने शानदार 61 धावांची खेळी केली. 

ठरला नववा बॅट्समन 

वसीकरण क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स चोपणारा नववा फलंदाज ठरला आहे. वसीकरण आधी 8 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. यामध्ये गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, युवराज सिंह, अँड्रयू वाईटली, हजरतुल्ला झझाई, लियो कार्टर, कायरन पोलार्ड आणि थिसारा परेराने ही कामिगरी केली आहे.

बायर उर्डिनजेन बूस्टरचा 52 धावांनी विजय 

बायर उर्डिनजेन बूस्टरने कोलन चॅलेंजर्सवर 52 धावांनी विजय मिळवला. बूस्टरने चॅलेंजर्सला विजयासाठी निर्धारित 10 ओव्हरमध्ये 116 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चॅलेंजर्सला 6 विकेट्स गमावून 63 रन्सच करता आल्या.