Hardik Pandya : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) विजय मिळवत टी-20 सिरीजमधील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) विनिंग सिक्स लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र हा विनिंग सिक्स मारणं हार्दिकला ( Hardik Pandya ) चांगलंच महागात पडलं आहे. कारण यावेळी नवखा तिलक वर्मा 49 रन्सवर नाबाद खेळत होता आणि हार्दिकच्या सिक्सने तिलकला हाफ सेंच्युरी पूर्ण करता आली नाही.
अशातच सामन्याची संबंधित एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये हार्दिक सामना संपवण्यापूर्वी तिलक वर्मा ( Tilak Varma ) च्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसतोय. स्टंप माईकमध्ये हार्दिकचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.
ज्यावेळी तिलक ( Tilak Varma ) आणि हार्दिक क्रिझवर होते त्यावेळी ही घटना घडली. यावेळी तिलक वर्मा 44 रन्सवर फलंदाजी करत होता. हार्दिक तिलकजवळ गेला आणि म्हणाला, तुला संपवायचंय...थांबायचंय...बॉल्सचा फरक पडतो. हार्दिकने तिलकला सांगितलेली ही गोष्ट स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली असून याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
— Nihari Korma (@NihariVsKorma) August 9, 2023
तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडिया हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना कर्णधार हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) ने असं कृत्य केलं ज्यामुळे सर्व चाहत्यांकडून त्याच्यावर टीका करण्यात येतेय.
भारताने सामना जिंकला तेव्हा 13 चेंडू अद्यापही शिल्लक होते अन् दुसऱ्या बाजूला तिलक वर्माला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका रनची गरज होती. यावेळी 14 बॉल्समध्ये 2 रन्सची गरज असताना हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. यावेळी हार्दिक पांड्याने सिक्स लगावला आणि विजय मिळवून दिला. त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या तिलक ( Tilak Varma ) ला हाफ सेंच्युरी पूर्ण करता आली नाही.
दुसऱ्या T20 मध्ये तिलक वर्मा 51 रन्स करून बाद झाला होता. पहिल्या T20 मध्ये वर्माने 39 रन्सची इनिंग खेळली होती. सिरीजमधील पहिले 2 सामने गमावल्यानंतर भारताने तिसरा सामना जिंकला. यावेळी सूर्यकुमार यादवने 83 रन्सची खेळी केली. त्याच्या या उत्तम खेळीच्या जोरावर टीमला विजय मिळवणं शक्य झालं.