बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलावात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक ठरला आहे.
दोन वर्ष बंदी असलेला स्टोक पुन्हा क्रिकेट खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने बेन स्टोक्सवर बोली लावली. 12 कोटी 50 लाखांना त्याला खरेदी केलं आहे. बेन स्टोक्सडी बेस प्राईस- 2 कोटी होती. बेन स्टोक्सला इतकी किंमत मिळाल्याने सगळेच हैराण आहेत. क्रिकेट हा जेंटलमेन लोकांचा खेळ म्हटला जातो पण बेन स्टोक्स याच्या उलट आहे.
बेन स्टोक्सचा स्वभाव खूपच आक्रमक आहे. तो मैदानावर बॉलिंग आणि बॅँटींग दोघांनी विरोधकांवर वार करतो. मैदाना बाहेर देखील भांडखोर असा त्याचा स्वभाव आहे. इंग्लंडच्या या क्रिकेटरवर मारहान केल्याचा देखील गुन्हा आहे. स्टोक्सला 25 सप्टेंबरला एका नाइट क्लबमधून अटक झाली होती.
बेन स्टोक्सला पुणे संघाने जेव्हा 14.5 कोटींना खरेदी केलं. तेव्हा तो सर्वात महाग विकला जाणारा विदेशी खेळाडू ठरला होता. त्याने त्याची किंमत वसूल देखील केली. मागच्या टूर्नामेंटमध्ये तो 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' ठरला.
बेन स्टोक्स 2018 च्या लिलावात देखील महागडा विकला जाईल अशी आधीपासूनच चर्चा होती. बेन स्टोक्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 12 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 316 रन केले आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक देखील आहे.