मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी...; IPL पूर्वी शिखर धवनचं मोठं विधान

के.एल राहुल पंजाबमध्ये नसल्याने कर्णधारपदाची धुरा शिखर धवन सोडून मयांक अग्रवालकडे देण्यात आली आहे.

Updated: Mar 19, 2022, 09:29 AM IST
मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी...; IPL पूर्वी शिखर धवनचं मोठं विधान title=

मुंबई : आयपीलचा 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरु होणार आहे. यावेळी पंजाब किंग्स (PBKS) आयपीएलमध्ये पूर्ण तयारीने उतरणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये पंजाबने बरेच मोठे खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनाचाही समावेश आहे. दरम्यान के.एल राहुल पंजाबमध्ये नसल्याने कर्णधारपदाची धुरा शिखर धवन सोडून मयांक अग्रवालकडे देण्यात आली आहे. अशातच आयपीएलपूर्वी शिखर धवनने मोठं विधान केलं आहे.

पंजाबने मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनला 8.25 कोटी रूपये देऊन आपल्या ताफ्यात घेतलं. तर सिझन सुरु होण्यापूर्वी धवन खूप उत्साहात असल्याचं दिसून येतं. यावेळी शिखरने मयांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं आहे.

शिखर धवन म्हणाला, "मी येणाऱ्या सिझन खूप सकारात्मक पद्धतीने घेणार आहे. मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी चांगला अनुभव असणार आहे. यावेळी आमच्याकडे एक मजबूत टीम आहे. मला वाटतं यावेळी आम्ही मोठं काहीतरी करून दाखवणार आहोत."

एका इंटरव्ह्यूमध्ये शिखर धवन म्हणतो, जर मला मयंकसोबत ओपनिंग करण्याची संधी मिळते तर ते अत्यंत चांगलं होईल. ती माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी असेल आणि ती पेलवण्यासाठी मी तयार आहे.

शिखर धवनला मेगा ऑक्शनमध्ये घेतल्यानंतर पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. कर्णधार म्हणून मयंकसोबत शिखरचं नावंही पुढे होतं. मात्र अखेरीस पंजाबने मयंक अग्रवालला कर्णधारम्हणून नियुक्त केलं.