टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर

दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकार सापडल्यानंतर जगभरात भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक आफ्रिकन देशांमधून प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2021, 07:24 PM IST
टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी सांगितले की, कोविड-19 चा नवीन प्रकार आल्यामुळे बीसीसीआयने संघ दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यापूर्वी भारत सरकारशी संपर्क साधावा. ते म्हणाले, 'केवळ बीसीसीआयच नाही तर प्रत्येक मंडळाने संघ पाठवण्यापूर्वी भारत सरकारचा सल्ला घ्यावा कारण तेथे कोविड-19 चे नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत येण्याचा धोका आहे.'

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. याआधी टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केलीये. आता भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार असून यादरम्यान दोन्ही देशांना तीन कसोटी, तीन वनडे आणि चार टी-20 सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कोविडचे नवीन प्रकार पाहता, आयसीसीने महिला विश्वचषक पात्रता फेरीही रद्द केली.

दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकार सापडल्यानंतर जगभरात भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक आफ्रिकन देशांमधून प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने सांगितले की, ओमिक्रॉन प्रकार वाढल्यानंतर सहभागी संघ कसे परततील या चिंतेमुळे स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पुढील फेरीसाठी दोन अतिरिक्त संघांसह न्यूझीलंडमध्ये 2022 विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम तीन पात्रता निश्चित करणाऱ्या नऊ संघांच्या प्राथमिक लीग टप्प्यातील स्पर्धेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.