Lehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर

1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Updated: Dec 5, 2021, 06:37 PM IST
Lehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर

मुंबई : टीम इंडियाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची (World Cup 1983) कामगिरी केली होती. त्या वर्ल्ड कपचा स्पर्धेतील थरार आणि अंतिम सामना हा काही मोजक्याच जणांना अनुभवता आला होता. आता याच 1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या '83' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज (song lehra do teaser) करण्यात आला. यानंतर आता अभिनेता रणवीर सिंहने सिनेमातील पहिलं गाणं 'लहरा दो' चं टीझर शेअर केला आहे.(bollywood actor ranveer singh shares film 83 song lehra do teaser video on twitter) 

रणवीरने "Keep The Tricolor Flying High" या कॅप्शनसह 'लहरा दो' चं टीझर शेअर केला आहे. हे गाणं उद्या 6 डिसेंबरला रिलीज केलं जाणार आहे. रणवीरने शेअर केलेल्या या गाण्याच्या टीझरमध्ये क्रिकेट सामन्याची तयारी सुरु आहे. अगदी भावनिक असा हा टीझर आहे. 

टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. हा ऐतिहासिक सिनेमा एकूण 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अशी आहे स्टारकास्ट

या सिनेमात रणवीर सिंह हा प्रमुख भूमिकेत आहे. तो सिनेमात कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यासह सिनेमात दीपिका पदुकोण, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क, चिराग पाटी, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.