VIDEO: श्वास रोखणाऱ्या सामन्यात धोनीसमोर ब्रावोचा डान्स

चेन्नईने आयपीएल २०१८मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून नवा इतिहास रचलाय. 

Updated: May 23, 2018, 04:07 PM IST
VIDEO: श्वास रोखणाऱ्या सामन्यात धोनीसमोर ब्रावोचा डान्स title=

मुंबई : चेन्नईने आयपीएल २०१८मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून नवा इतिहास रचलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने हैदाराबादला २ विकेटनी हरवले. या विजयासोबतच धोनीच्या संघाने सातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये बाजी मारली. मॅन ऑफ दी मॅच फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले. या विजयासोबत चेन्नई सातव्यांदा फायनलमध्ये पोहोचली. डू प्लेसिसने नाबाद ६७ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. 

हैदराबादने विजयासाठी ठेवलेल्या १४० धावांचा पाठलाग करताना चेन्नईने ११३ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. मात्र प्लेसिसने १८व्या शतकात २० आणि १९व्या शतकांत १७ धावा करताना चेन्नईला विजयासमीप पोहोचवले. त्यानंतर २०व्या शतकांतील पहिल्या चेंडूवर षटकार मारत चेन्नईला दोन विकेटनी विजय मिळवला. अखेरीस शार्दूल ठाकूरने डू प्लेसिसला चांगली साथ दिली. त्याने पाच चेंडूत तीन चौकारांच्या साथीने १५ धावा केल्या.

हैदराबादविरुद्ध मिळवलेल्या दिमाखदार विजयानंतर चेन्नईचा क्रिकेटर ड्वायेन ब्रावोने जबरदस्त डान्स केला.  

सामना संपल्यानंतर खेळाडूंनी बसमध्येच गाणी गात आणि डान्स करत जल्लोष सुरु केला.