Footballer Pele Dies at 82 : जगातील महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं असून वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून पेले यांची प्रकृती नाजूक होती. कॅन्सर आजारामुळे त्यांची किडनी आणि हृदय काम करत नव्हतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावली होती. सप्टेंबर 2021 मध्ये पेले यांच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. (breaking Pele death news Brazilian legend football pele dies at 82 latets marathi sport news)
Pele, the magical Brazilian soccer star who rose from barefoot poverty to become one of the greatest & best-known athletes in modern history, died at the age of 82, his daughter said on Instagram, reports Reuters citing his daughter's Instagram post. pic.twitter.com/LQsfRgjPac
— ANI (@ANI) December 29, 2022
ब्राझीलला तीनवेळा विश्वचषक जिंकून दिला
पेले यांनी ब्राझीलला तिनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. 1958 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी दोन गोल मारले होते. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.
ब्राझीलसाठी त्यांनी 91 सामने खेळले असून एकूण 77 गोल केले आहेत. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेत्या अर्जेंटिनाचं त्यांनी अभिनंदन केलं होतं. तसेच लियोनेल मेस्सी विजयाचा खरा हिरो असल्याचं सांगत कौतुक केलं होतं.