नवी दिल्ली : सध्या कॅरेबियन प्रिमिअर लीगची जोरदार धूम सुरू आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू रेकॉर्ड्सचा पाऊस पाडत आहेत. यासोबत लांबच लांब सिक्सरही ठोकत आहेत. न्यूझीलंडच्या मॅक्यूलमने ६२ बॉल्समध्ये ९१ रन्सची दमदार खेळी केली.
त्रिनबागो नाईट रायडर्सने कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये जमैका तल्लावाहवर ३६ रन्सनी विजय मिळवला. पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी आलेल्या नाईट रायडर्सने पहिल्याच बॉल्सवर सुनील नरेनची विकेट गमावली. मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या ब्रॅंडन मॅक्यूलमने कॉलिन मुनरोसोबत केवळ ५३ बॉल्समध्ये ९२ रन्सची खेळी केली. या खेळाडूने ५ फोर आणि १ सिक्सर लगावला.
SIX!! Wow!! Check out this #HeroMaximum from @Bazmccullum last night! What a shot! @Heromotocorp #CPL17 #Biggestpartyinsport #JTvTKR pic.twitter.com/uEhopHepqW
— CPL T20 (@CPL) August 27, 2017
या सामन्यात प्रेक्षकांसाठी सर्वात जास्त आकर्षण ठरला तो मॅक्यूलमने मारलेला शानदार सिक्सर. या सिक्सरने युवराज सिंहच्या आणि गेलच्या सिक्सरची अनेकांना आठवण करून दिली. ओडेन स्मिथ बॉलिंग करत होता. ओडेनच्या पाचव्या बॉलवर मॅक्यूलमने शानदार सिक्सर लगावला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
आयपीएल मध्ये वेस्टइंडिजचा विस्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने लगावलेले सिक्सर सर्वांनीच पाहिले आहेत. या लीगमध्येही त्याचा फटकेबाजीच अंदाज बघायला मिळाला. कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये सेंट किड्स अॅण्ड नेविस पेट्रियट्सकडून खेळताना त्रिनबागो नाईट रायडर्स विरूद्ध त्याने ४७ बॉल्समध्ये ९३ रन्स केले होते. यात खेळीत त्याने ८ सिक्सर आणि ५ फोर लगावले होते.